Ladaki Bahin Yojana;तब्बल 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र !

मुख्यमंत्री माझी Ladaki Bahin Yojana राज्य शासनाची एक महत्वकांशी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ही योजना राज्यभरात सुपरहिट ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र 21 ते 65 वयोगटातील महिलांना १५०० रुपये हप्ता प्रत्येक महिन्याला मिळत आहे.

योजना सुरू करताना राज्य शासनाने या योजनेमध्ये काही निकष निश्चित केले होते, पण काही महिलांनी या निकषा बाहेर जाऊन लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेतला आहे.
त्यामुळे आता तब्बल 5 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची बातमी समोर येत आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या लाभाची रक्कम 24 जानेवारी आणि 25 जानेवारी या दोन टप्प्यात वितरित करण्यात आली. त्यावेळी आदिती तटकरे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लाडक्या बहिणींची संख्या 2 कोटी 41 लाख इतकी होती. म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या जानेवारी महिन्यात 5 लाखांनी घटली आहे. डिसेंबर महिन्यात लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. तर, जानेवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 41 लाख झाली आहे.

Ladaki Bahin Yojana लाभार्थी कोणत्या कारणानं कमी झाले ?

1) लाडकी बहीण योजनेतील कमी झालेल्या 5 लाख लाभार्थ्यांपैकी दीड लाख लाभार्थी महिलांचं वय 65 वर्ष पूर्ण झाल्यानं त्यांना याचा लाभ मिळणार नाही.

2) महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार ज्या महिलांच्या नावावार किंवा कुटुंबात चारचाकी वाहन असेल त्यांना यातून वगळलं जाणार आहे.

3) ज्या लाभार्थी कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच लाभ दिला जाणार आहे.

4)  ज्या महिला नोकरी करतात आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे त्या संदर्भातील माहिती आयकर विभागाकडून घेतली जाणार आहे व अशा महिलांनाही यातून वगळले जाणार आहे.

महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून लागू केली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीनं आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली आहे.

महायुतीनं विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान त्यांचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींनी दिल्या जाणाऱ्या लाभाची रक्कम 1500 वरुन 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. लाडक्या बहिणींना त्या घोषणेच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे.

अपात्र महिलांचे दिलेले पैसे सरकार परत घेणार का ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी 2025 पासून  सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै 2024 ते डिसेंबर 2024 ) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी”.

 लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये करण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. आता येत्या काही दिवसात लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment